‘पेट्रोल टँक फुल्ल करून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार’

नवी दिल्ली – जागतीक पातळीवर युद्ध सुरू झाल्याने अनेक गोष्टींचे दर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर देखील गगणाला भिडले आहेत. मात्र भारतात अद्याप कोणत्याही प्रकारची इंधन दरवाढ करण्यात आलेली नाही. मात्र आता इंधन दरवाढ होणार असल्याचा इशारा काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी दिला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष गांधी यांनी पुन्हा एकदा डिझेल-पेट्रोलच्या दरांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारला टोला लगावला. राहुलने लिहिले की, पेट्रोलच्या टाक्या लगेच फुल्ल करून घ्या. मोदी सरकारची ‘इलेक्शन’ ऑफर संपणार आहे.
फटाफट Petrol टैंक फुल करवा लीजिए।
मोदी सरकार का ‘चुनावी’ offer ख़त्म होने जा रहा है। pic.twitter.com/Y8oiFvCJTU
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 5, 2022
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजपचे लोक धर्माच्या नावावर आणि खोटू बोलून मते मागतात. त्याचवेळी त्यांनी समाजवादी पक्षाच्या (एसपी) राजवटीतील कायदा, सुव्यवस्था आणि गुंडगिरीचा मुद्दा उपस्थित केला. तर बहुजन समाज पक्षाला (बसपा) भाजपची ‘बी’ टीम म्हटले.





