‘त्या’ ट्विटमुळे निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
Updated On:

जळगाव – माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवार सुरु असताना राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना उद्देशून निलेश राणे यांनी टीका केली. त्यावेळी त्यांनी वापरलेल्या शब्दावर तृतीय पंथियांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी निलेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. निलेश राणे यांनी तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक वक्तव्य केले आहे, असे त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे. दरम्यान, याप्रकरणी निलेश राणे यांनी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे.





