FIH Hockey Pro League 2023/24 : भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव….

FIH Women’s Hockey Pro League 2023/24 : भारतीय महिला हॉकी संघाला एफआयएच (FIH) प्रो लीग 2023-24 च्या युरोप टप्प्यात बेल्जियमविरुद्ध 2-0 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना गुरुवारी बेल्जियममधील अँटवर्प येथे खेळला गेला. हा भारतीय संघाचा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता, याआधी भारतीय महिला संघाला बुधवारी अर्जेंटिनाविरुद्ध 5-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता.
Team India held strong in defense until the first half but couldn’t maintain in the second. We’ll come back stronger! 💪🏑
BELGIUM 🇧🇪 2-0 INDIA 🇮🇳
Goals Scorers:
34′ T Serstevens Alexia
36′ Dewaet Louise#HockeyIndia #IndiaKaGame #FIHProLeague24 #IndiaWomensTeam
.
.
.
.… pic.twitter.com/8EIw1HPtEw— Hockey India (@TheHockeyIndia) May 23, 2024
हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ गोल करण्यात यशस्वी ठरले नाही, पण हाफ टाईम संपल्यानंतर बेल्जियमच्या महिला संघाने सामन्याच्या 34व्या आणि 36व्या मिनिटाला दोन मैदानी गोल करत भारताविरुद्ध 2-0 अशी आघाडी घेतली. बेल्जियमसाठी हे गोल टी-सेर्स्टेव्हन्स ॲलेक्सिया आणि डेव्हेट लुईस यांनी भारतीय बचावफळी आणि गोलरक्षक सविता पुनियाला चुकवत केले.
मात्र, सामन्याच्या शेवटच्या क्षणी बेल्जियमने दोन पेनल्टी कॉर्नर प्राप्त केले, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. अखेरीस बेल्जियमने आपली आघाडी कायम ठेवत भारताविरुद्धचा सामना 2-0 ने खिशात घातला. भारतीय महिला हॉकी संघ आता पुन्हा एकदा शनिवारी, 25 मे रोजी बेल्जियमविरुद्ध मैदानात उतरणार आहे.





