Rose Day 2024: ‘या’ खास कारणासाठी दरवर्षी साजरा केला जातो ‘रोझ डे’, जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवसाचा इतिहास

Rose Day 2024: दरवर्षी व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Day) 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. हा दिवस जगभरात रोझ डे मानला जातो. या दिवशी प्रत्येक जोडपे एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवशी बाजारात विविध प्रकारच्या गुलाबांना मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत, प्रेमात असलेल्या लोकांसाठी हा सुंदर दिवस कसा सुरू झाला हे तुम्हाला माहिती आहे का? तर याबाबत सविस्तर जाणून घेऊया..
रोझ डेची सुरुवात कशी झाली ?
रोझ डेच्या दिवशी कपल्स एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. या दिवसाची सुरुवात मुघल काळापासून झाली आहे. असे म्हणतात की मुघल बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाबाची खूप आवड होती. अशा स्थितीत त्यांना खूश करण्यासाठी जहांगीर त्यांना रोज मोठ्या प्रमाणात ताजे गुलाब पाठवत असे.
त्याच वेळी, असे देखील म्हटले जाते की राणी व्हिक्टोरियाने त्यांचे पती प्रिन्स अल्बर्ट यांना प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब दिले होते. राणी व्हिक्टोरियाच्या काळापासून, लोकांनी आपल्या प्रियजनांना विशेष वाटण्यासाठी 7 फेब्रुवारीला गुलाब देण्यास सुरुवात केली आणि ही परंपरा आजही सुरू आहे.
रोझ डे का साजरा करावा?
या दिवशी एकमेकांना गुलाब देऊन प्रेम व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. हे दर्शविते की आपण या नात्याला महत्त्व देता. अनेकांना वाटतं की हा दिवस फक्त प्रेमींसाठी आहे. पण तसे नसून तुम्ही हा दिवस तुमच्या पालकांसोबत किंवा मित्रांसोबतही साजरा करू शकता आणि त्यांना खास अनुभव देऊ शकता.




