Rinku Rajguru : अथांग समुद्र अन्…; ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त रिंकू राजगुरूचा लाल साडीतील खास अंदाज
Rinku Rajguru : व्हिडिओमध्ये सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी रिंकु राजगुरू लाल साडीत धावत असल्याचे दिसते.
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूला ‘सैराट’ सिनेमामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर तिने अनेक मराठीसह हिंदी चित्रपपटांमध्येही काम केले.
याशिवाय रिंकु सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच तिने व्हॅलेंटाईन डेनिमित्त खास व्हिडिओ शेअर केला आहे.
रिंकूनं Love is in the air असं म्हणत लाल रंगाच्या साडीतील लुक शेअर केला आहे. यात ती सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी धावत असल्याचे दिसते. रिंकूनं या व्हिडीओसह चाहत्यांना ‘हॅप्पी व्हॅलेंटाईन डे’म्हणत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. रिंकुचा हा अंदाज अनेकांच्या पसंतीस पडला आहे. चाहत्यांनी तिच्या लुकचे कौतुकही केले आहे.
View this post on Instagram
रिंकूच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, तिचा ‘आशा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर नुकताच तिचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. यात अभिनेते अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. Rinku Rajguru :
हेही वाचा:





