नारिशक्तीचा सन्मान आणि आदर झालाच पाहिजे

सातारा – नारिशक्तीचा सन्मान आणि आदर झालाच पाहिजे. भारतीय संविधानात म्हटल्याप्रमाणे कोणताही भेदभाव न करता सर्व माता-भगिनींना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे, महिलांबाबत अपराध करणार्या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली सातार्यात नारिशक्ती जागृती अभियानाची सुरुवात शनिवारी करण्यात आली.
धैर्यशील कदम म्हणाले, महिला व मुलींकडे वाईट नजरेने बघणार्यांचे डोळे फोडले पाहिजेत. बदलापूर घटनेसारखी घृणास्पद कृत्ये करणार्या नराधमांना फाशी दिली पाहिजे. याबाबत राज्य सरकार नक्कीच कठोर निर्णय घेईल. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस सुनिशा शहा म्हणाल्या, महिलांना आदराची वागणूक मिळाली पाहिजे. त्यांचा अपमान करणार्या अपराध्यांना कडक शासन झाले पाहिजे. यावेळी नारिशक्तीच्या सन्मानाची शपथ घेण्यात आली
भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेणू येळगावकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित भिसे, जिल्हा सरचिटणीस मनीषा पांडे, जिल्हाचिटणीस निशा जाधव, ओबीसी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वनिता पवार, शहराध्यक्ष गौरी गुरव, अनुसूचित जाती मोर्चा महिला आघाडी शहराध्यक्ष अंजनी त्रिंबके, शहर उपाध्यक्ष चित्रा माने, युवती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सायली धोत्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, डॉ. सचिन भोसले, डॉ. सचिन साळुंखे,
आप्पा कोरे, माजी नगरसेवक धनंजय जांभळे, विजय कटवटे, सुनील काळेकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोसले, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, जयराज मोरे, विजय नाईक, राजेश शेडगे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, अक्षर भोसले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, विजय पवार, सनी साबळे, रोहित किर्दत, प्रशांत पोतेकर, आशिष सकुंडे, यशवर्धन मुतालिक, निखिल वाघमारे, प्रथमेश मोरे, अक्षय चांगण, चेतन पवार, अमेय घाडगे, श्रीकांत साबळे, अजय शेळके, तुषार घोरपडे, मयूर साबळे, अजित पवार, सुनील लाड, राहुल राठोड, प्रथमेश इनामदार, हर्षद नलवडे, विशाल सावंत, साहिल मोरे, श्रीधर हदगे, शुभम नाईक उपस्थित होते.





