शाळांकडून शुल्क सवलतीची अंमलबजावणी व्हावी, युवा सेनेचा शिक्षण आयुक्तांकडे आग्रह

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना 15 टक्के शुल्क सवलत देण्याचे आदेश बजाविले आहेत. याची सर्व शाळांकडून अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी युवा सेनेने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.
युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे, सहसचिव विशाल सातव, शर्मिला येवले यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे विधानसभा अधिकारी सनी गवते, विकास बधे, गौरव पाफळ, उपविधानसभा अधिकारी अक्षय फुलसुंदर, प्रशांत पैलवान, रमेश शिरसागर, तुफान उंडे, प्रथमेश बुकम, गौरव गायकवाड, रोहित कुचेकर, महेश परदेशी, अविनाश राऊत, रेणुका साबळे, निकिता भोसले, वेदांत नागरे, ओंकार कुर्हे, समीर कोतवाल, मयूर कुटे, सूरज शिंदे, वैभवी सूर्यवंशी, ममता तांबोळी, नंदिनी लोट आदींच्या शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्तांची भेट घेतली व त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
शुल्क सवलतीसंदर्भातील विभागीय तक्रार निवारण केंद्र ही पूर्ण पुणे विभागाची एकाच ठिकाणी न ठेवता ग्रामीण भागातील तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी आणि शहर स्तरावर शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावर चालू करावीत. “आरटीई’ कायद्यानुसार प्रवेश निश्चित झाल्यानंतर पालकांना “एनआयसी’कडून प्रवेशाबाबतच्या पुढील सूचना त्वरीत मिळाल्या पाहिजेत. “आरटीई’ प्रवेशासाठी तालुका आणि शहर स्तरावर टास्क फोर्स नियुक्त करावी, “आरटीई’मधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून इतर कोणत्याही स्वरूपाची शुल्क आकारली केली जाऊ नये आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावर शिक्षण आयुक्तांनी दखल घेऊन लवकरच संबंधित यंत्रणांना आदेश पारित करण्यात येतील असे आश्वासन दिले.





