Athletics Federation of India | निवड समितीवर पी. टी.उषाची नियुक्ती
Updated On:

नवी दिल्ली – माजी ऑलिम्पिकपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती पी. टी. उषा यांची भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. वरिष्ठ गटाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी गुरबचन सिंग रंधवा यांची वर्णी लागली आहे.
निवड समिती : वरिष्ठ ः जी. एस. रंधवा (अध्यक्ष), बहादूरसिंग, बहादूरसिंग सग्गू, उदय प्रभू, प्रवीण जॉली, ज्योतिर्मयी सिकदर, कृष्णा पूनिया, गोपाल सैनी (सदस्य).
कनिष्ठ : पी. टी. उषा (अध्यक्ष), सोमा बिस्वास, आनंद मेनोस, सतबीरसिंग, संदीप सरकारिया, सुनीता राणी, रमा चंद्रन, जोसेफ अब्राहम, हरवंत कौर, एम. डी. वलसामा, कमल अली खान (सदस्य).





