Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम
Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवजात बालकांचा आहार आणि शिशु फॉर्म्युला उत्पादनांबाबत एक महत्त्वपूर्ण व कडक आदेश जारी केला आहे.

Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. आज त्यांनी नवजात बालकांच्या आहाराबाबत ऑर्डर काढली आहे, जी 2 वर्षापर्यंतची लहान मुले आहेत त्यांच्यासाठी आहे. 2 वर्षांच्या खालील मुलांना पॅकेजमधून दिला जाणारे प्रत्येक उत्पादन जे असेल, त्यात शिशु फॉर्म्युला, शिशु दूध, अन्न यासह इतर गोष्टी असतात. (Tukaram Mundhe)
पॅकबंद पारंपरिक शिशु अन्न 6 महिन्यानंतर दोन वर्षापर्यंत दिले जाते. 6 महिन्यांपर्यंत आईचेच दूध शिशुला द्यावे. पुरवठादार, ब्रँड मालक, ई कॉमर्स विक्रेते या सगळ्यांना ही ऑर्डर लागू राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. (Tukaram Mundhe)
मुंढे यांनी म्हटले की, शाळांबाबत आपण ऑर्डर काढली होती ती 22 महिने ते 18 वर्ष मुलासाठी ऑर्डर काढली होती. ही ऑर्डर 2 वर्षापर्यंतची लहान मुले आहेत त्यांच्यासाठी आहे. (Tukaram Mundhe)
राज्यभरात आम्ही याबाबत तपास केला असून, आईचे दूध सर्वोत्तम दूध अशा प्रकारची सूचना शिशु प्रॉडक्ट्सवर पुढील बाजूला हवी ती अनेक ठिकाणी दिसली नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्यवर परिणाम होत आहे. (Tukaram Mundhe)
अन्न कोणत्या वेळापासून द्यावे हे सांगणारी सूचना देखील त्यावर नाही. इशारा सूचना देखील आढळल्या नाहीत. ही सूचना आवश्यक आहे. बेसिक तत्व या ऑर्डर मागे आहे ते म्हणजे पॅकेजमध्ये शिशुला हे अन्न कधी दिले जावे, यांची माहिती देणे गरजेचे आहे. भारतात यामागे दोन कायदे आहेत, असे मुंढे यांनी म्हटले. (Tukaram Mundhe)
फॉर्म्युला मिल्कला बंदी नाही, पण नियम पाळणे गरजेचे आहे. हेल्थवर याचा परिणाम कसा होतो याचा डेटा आमच्याकडे आहे. बालकांना आहार चुकीच्या पद्धतीने जात आहे. 6 महिन्याखालील मुलांचे आईच्या दुधाचे स्तनपानाचे प्रमाण पाच वर्षात 63.7 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत आले आहे. (Tukaram Mundhe)
शिशुच्या जन्मानंतर पहिले 6 महिने आईचेच दूध द्यायचे असते ते कमी झाले आहे. राज्यातील शहरी भागात 52 टक्के स्तनपान केले जाते, तर ग्रामीण भागात 75 टक्के स्तनपानाचे प्रमाण आहे. यामध्ये शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्थिती चांगली आहे. (Tukaram Mundhe)
डिलेव्हरी झाल्यानंतर 1 तासात स्तनपान झाले पाहिजे. मात्र याची आकडेवारी कमी होत चालली आहे. याची डॉक्टर व्यवस्थित माहिती देत नाहीत असा याचा अर्थ होतो. या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे, असे मुंढे म्हणाले. (Tukaram Mundhe)
सप्लिमेंटस प्रॉडक्टचा प्रचार करता येणार नाही. तसेच, आईच्या दुधाच्या समकक्ष अशी जाहिरात करता येणार नाही. मोफत नमुने, कुपन हे देता येणार नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. (Tukaram Mundhe)
1. सर्व पॅकेजवर आईचे दूध हे शिशुसाठी सर्वोत्तम दूध, असे लिहिणे बंधनकारक असेल.
2. मेडिकल प्रिस्क्रिप्शनच्या सल्ला नुसार वापर करावा.
3. हा एकमेव पर्याय नाही असेही लिहावे.
4. हे सप्लिमेंटरी फुड आहे आणि ६ महिन्यानंतर वापर करावा असे लिहावे लागणार.
5. पॅकेजवर आई आणि मुलाचा फोटो वापरता येणार नाही.
Tukaram Mundhe : ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’: तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत





