Umbraj News : उंब्रजला भीम व माता कुंती मूर्तींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन
Umbraj News : ‘भीमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’ या जयघोषात भीमाचा गाडा ओढत उंब्रज (ता. कराड) येथील महिनाभर चालणाऱ्या भीम कुंती उत्सवाची आज दि. २९ रोजी उत्साहात झाला.

Umbraj News : ‘भीमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’ या जयघोषात भीमाचा गाडा ओढत उंब्रज (ता. कराड) येथील महिनाभर चालणाऱ्या भीम कुंती उत्सवाची आज दि. २९ रोजी उत्साहात झाला. भीमसेन मंडळाचे कार्यकर्ते तसेच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक पद्धतीने कृष्णा नदी पात्रात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. (Umbraj News)
अनेक वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या या उत्सवाचा श्रावणातील शेवटचा सोमवार हा मुख्य दिवस असतो. सोमवार दि. ७ रोजी पुत्र भीम व माता कुंती यांच्या भेटीचा अनोखा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. (Umbraj News)
परंपरेनुसार भाद्रपद पोर्णिमेनंतर भीमसेन महाराज व कुंती माता यांच्या विसर्जनाची तयारी सुरु झाली होती. शनिवारी दि. २६ रोजी रात्री भीम मंडपात खिरीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी दि. २८ रोजी भीमसेन महाराज दिल्ली दरवाजात आणण्यात आले. (Umbraj News)
त्यानंतर भाविकांनी नवस बोलण्याचा व बोललेले नवस फेडण्याचा नारळाची तोरणे बांधून कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. सोमवारी रात्री कोल्हापूर येथील कलापथक कार्यक्रम झाला. आज दि.२९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुत्र भीम व कुंती माता यांची दिल्ली दरवाजात विधीवत पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. (Umbraj News)
भीमाचा गाडा ओढण्यासाठी भीमसेन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच तरुणांनी सहभाग घेतला. जाणकार मंडळी मार्गदर्शन करत होती. यावेळी जयघोषात भीम गाडा ओढत कृष्णा नदीपात्राकडे नेण्यात आला. (Umbraj News)
यावेळी पांडवपुत्र भीम- माता कुंती यांच्या मूर्ती विसर्जनासाठी नेत असताना जागोजागी महिलांनी आरती ओवाळून मनोभावे दर्शन घेऊन पेढ्यांसह नैवेद्य दाखवून प्रसादाचे वाटप केले. भीम गाडा नदीकाठी विसावल्यानंतर विधीवत पूजन आरती करून नवस बोलण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तींचे विसर्जन कृष्णा नदीपात्रात करण्यात आले. (Umbraj News)





