जगप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंह यांचे निधन ; अपघातात झाले होते जखमी, ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Fauja Singh passed away। पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात झालेल्या अपघातात जगप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंह हे गंभीर जखमी झाले होते . मात्र त्याने उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते ११४ वर्षांचे होते आणि त्यांच्या मूळ गावी बियास याठिकाणी फिरायला गेले असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जालंधरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्याठिकाणी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुःखद घटनेची पुष्टी जालंधर पोलिसांनी आणि त्यांच्या जीवनावर ‘द टर्बनेड टॉर्नेडो’ हे पुस्तक लिहिणारे लेखक खुशवंत सिंग यांनी केली आहे.
पोलिसांकडून वाहन आणि चालकाचा शोध Fauja Singh passed away।
आदमपूर पोलिस ठाण्याचे एसएचओ हरदेवप्रीत सिंग यांनी याविषयी बोलताना,”अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि वाहन आणि चालकाचा शोध घेत आहेत. ही घटना दुपारी ३.३० च्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा फौजा सिंग रस्ता ओलांडत होते. खुशवंत सिंग यांनी सोशल मीडियावर फौजा सिंग यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि लिहिले, “माझा ‘टर्बनेड टॉर्नेडो’ आता नाही.”
राज्यपालांसह अनेकांनी दुःख व्यक्त केले Fauja Singh passed away।
पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया यांनीही फौजा सिंग यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत, “एक महान मॅरेथॉन धावपटू आणि चिकाटीचे प्रतीक असलेले सरदार फौजा सिंग जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांनी वयाच्या ११४ व्या वर्षी ‘नशा मुक्त, रंगला पंजाब’ या मोर्चात माझ्यासोबत भाग घेतला होता. त्यांचा वारसा पंजाबला ड्रग्जमुक्त करण्यासाठी प्रेरणा देत राहील.” असे म्हटले आहे. दरम्यान , सोशल मीडियावर या बातमीवर हजारो लोक शोक व्यक्त करत आहेत.
फौजा सिंग कोण होते?
फौजा सिंग जगभरात ‘पगडीवाला टोर्नाडो’ म्हणून ओळखले जात होते. ते त्यांच्या वयाच्या या टप्प्यावरही केवळ सक्रिय नव्हते तर तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत देखील राहिले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतींमध्ये भाग घेतला आणि आरोग्य, व्यसनमुक्ती आणि तंदुरुस्तीशी संबंधित सामाजिक मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने देशाने केवळ एक धावपटूच नाही तर एक जिवंत प्रेरणास्थान गमावले आहे.





