Virat Kohli : वडिलांचे निधन, आईने स्विकारली जबाबदारी; विराट कोहलीच्या कुटुंबात कोण-कोण?
Virat Kohli : त्याच्या चाहत्यांना नेहमी त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडते.

Virat Kohli : क्रिकेटचा बादशाह सर्वांचा लाडका किंग कोहली आज त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहलीने क्रिकेटचं मैदान गाजवलं. भारतासाठी त्याने केलेली कामगिरी महत्वाची मानले जाते.
कोहलीने आपला सर्वात्तम खेळ खेळत मोठं नावं कमावलं. त्याचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. त्याच्या चाहत्यांना नेहमी त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडते.
विराट त्याच्या खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. आज त्याच्या कुटुंबात कोण-कोण आहे हे जाणून घेऊयात…वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, आकाश चोप्रा आणि शिखर धवन यांसारखे अनेक खेळाडू दिल्लीतून आले. विराटचा जन्म देखील दिल्लीतील पश्चिम विहार भागात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
त्याचे वडील प्रेम कोहली हे पेशानेवकील होते आणि त्यांनी विराटला क्रिकेटपटू बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. विराटच्या आईचे नाव सरोज असून पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्विकारली. तीन मुलांचे संगोपन त्यांनी केले. विराट तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे.
विराटच्या भावाचे नाव विकास असून दोघांमध्ये खूप प्रेम आहे. त्यांना एक बहिण आहे तिचे नाव भावना आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये विराटने गुरुग्राममधील आपल्या अंदाजे ८० कोटी रुपये किमतीच्या आलिशान बंगल्याचे (डीएलएफ सिटी फेज-१) जनरल पॉवर ऑफ ॲटर्नी (GPA) आपल्या मोठ्या भावाच्या नावावर हस्तांतरित केली.
विकास विराटचा ब्रँड, ‘वन८’ (One8) सांभाळतो. विकास हा फारचा कुठे चर्चेत नसतो. विकास कोहलीचा मुलगा आर्यवीर एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. त्याने नुकतेच दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावात भाग घेऊन प्रसिद्धी मिळवली. आर्यवीरकडे कोहली कुटुंबाच्या क्रिकेट परंपरेची पुढची पिढी म्हणून पाहिले जाते.
विराट कोहलीची मोठी बहीण भावना दिल्लीत शिकली आहे. ती स्टाईल आणि फॅशनमध्ये तिची वहिनी, अनुष्का शर्मालाही टक्कर देते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दोन्ही भाऊ आणि आईसोबत तिचे घट्ट नाते आहे.
विराट आणि अनुष्का सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. त्यांना वामिका नावाची मुलगी आणि अकाय नावाचा मुलगा आहे. दोघेही आपल्या आयुष्यात खूप आनंदी असून, अनेकदा विविध ठिकाणी एकत्र दिसतात. सोशल मीडियावर देखील सतत सर्क्रिय असतात.





