पुणे | अल्पवयीन मुलगा, मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला अटक
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोटच्या अल्पवयीन मुलासह मुलीवर अत्याचार करणार्या नराधम ३३ वर्षीय बापाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दि. १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हा प्रकार कोंढवा खुर्द परिसरात घडला.
या प्रकरणात पित्यासह पीडितांच्या आजी-आजोबावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलांच्या आईने फिर्याद दिली आहे. मार्च २०२१ ते मार्च २०२४ या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी पित्याला विशेष न्यायालयात हजर केले असता, गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.
या गुन्ह्याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी, सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली.





