Drowned News : ह्रदयद्रावक दुर्घटना..! वडिलांसह दोन चिमुकल्यांचा धरणात बुडून मृत्यू; अंजनेरी शिवारात शोककळा
Drowned News : दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पाहुण्यांकडे आलेल्या एका कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला आहे.

Drowned News : दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पाहुण्यांकडे आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारातील बेझे धरणात बुडून वडिलांसह त्यांच्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Drowned News)
आंघोळीसाठी धरणात उतरले अन् दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त बेझे धरणाजवळील उत्तम चव्हाण यांच्या घरी पाहुणे आले होते. सकाळच्या सुमारास सुरेश भोर हे आपल्या दोन मुलींसह आंघोळीसाठी धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. या दुर्घटनेत वडिलांसह दोन्ही मुलींना जीव गमवावा लागला. (Drowned News)
वडिलांसह दोन चिमुकल्यांचा अंत
या दुर्घटनेत सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७) यांचा मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Drowned News)


