उन्नावमध्ये भीषण अपघात, डबल डेकर बस दुधाच्या कंटेनरला धडकली 18 जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जखमी

UP ACcident | उन्नावमध्ये आज सकाळी मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लखनऊ -आग्रा एक्स्प्रेस वेवर एका भरधाव बसने दुधाच्या कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जाणाऱ्या बसचा बुधवारी सकाळी अपघात झाला. या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, डबल डेकर बस नियंत्रणाबाहेर गेली आणि दुधाच्या कंटेनरला धडकली, त्यानंतर हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, तेथे उपस्थित सर्वजण घाबरून गेले. या घटनेबाबत उपस्थित लोकांनी त्वरित पोलिसांना कळवले.
Passenger bus collides with milk van in Unnao: 18 dead, several injured
Read @ANI Story | https://t.co/sYfXwUZ4Ew#Passenger #Unnao #milk #collision pic.twitter.com/G6xPnOLshx
— ANI Digital (@ani_digital) July 10, 2024
माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्यात सुरु आहे. उन्नावचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. सीओ बांगरमाऊ अरविंद चौरसिया यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तेथे बचाव मोहीम राबवत आहेत.
UP ACcident | सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले
लखनऊ – आग्रा एक्स्प्रेस वेवर बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर सर्व जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू असून हे वृत्त लिहिपर्यंत त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
उन्नावचे पोलिस अधीक्षक, क्षेत्र अधिकारी बांगरमाऊ आणि इतर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी उपस्थित आहे. बसचा क्रमांक UP95 T 4720 असून दुधाने भरलेल्या कंटेनरचा क्रमांक UP70 CT 3999 आहे. मृतांमध्ये 14 जणांची ओळख पटली आहे.
मेरठचा दिलशाद, शिवहरचा रजनीश, शिवहरचा लालबाबू दास, रामप्रवेश कुमार, भारतभूषण कुमार, बाबू दास, मोहम्मद सद्दाम, नगमा, शबाना, चांदनी, मोहम्मद शफीक, मुन्नी खातून आलम. मृत्युमुखी पडलेल्या चार प्रवाशांची ओळख पटलेली नाही.





