पुणे – ‘उपवास’ (Fast) म्हटलं की हा अनेकांसाठी श्रद्धेचा भाग आहे तर अनेकजण डायटिंग म्हणून देखील याकडे पाहतात. अजूनही बरेच लोक मानतात की उपवास (Fast) हा केवळ उपासनेचा एक भाग आहे. प्रत्यक्षात तो आरोग्य (Health) फायदे मिळवण्याचा एक चांगला मार्ग देखील आहे.
शरीराला (Health) निरोगी ठेवण्यासाठीही उपवासाचं मोठं योगदान असतं. आज आम्ही तुम्हाला उपवासाचे (Fast) फायदे सांगणार आहोत, उपवास (Fast) केल्याने माणसाला किती आरोग्यदायी फायदे मिळू शकतात याची तुम्हाला प्रचिती होईल…
उपवास म्हणजे काय?
सोप्या शब्दात, सांगायचं झालं तर “विशिष्ट कालावधीसाठी पूर्णपणे खाणे आणि पिणे बंद करणे किंवा फक्त कमीत कमी अन्न घेणे” याला उपवास म्हंटलं जात. उपवासाचा कालावधी साधारणपणे 12 ते 24 तास असतो,
परंतु उपवास काही दिवसांपासून आठवडे आणि महिनेही असू शकतात. असेल की, काही उपवासांमध्ये, सर्व खाणे आणि पिणे निषिद्ध आहे, तर इतर उपवासांमध्ये, चहा, कॉफी, पाणी आणि फळे यासारख्या काही गोष्टी खाण्याची आणि पिण्याची परवानगी आहे.
उपवासाचे फायदे !
1 – उपवासाचा पहिला फायदा म्हणजे तो शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
2 – उपवास केल्याने वजन कमी होते. उपवास करताना, चरबी जाळण्याची प्रक्रिया वाढते आणि चरबी कमी होते.
3 – उपवासामुळे नवीन रोगप्रतिकारक पेशी तयार होतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
4 – उपवास ठेवल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोट खराब असल्यास तुम्ही कधीही उपवास करू शकता.
5 – उपवास केल्याने मेटाबॉलिक रेट 14 टक्क्यांपर्यंत वाढतो. यामुळे कॅलरी बर्न होण्यास कमी वेळ लागतो.
6 – मेंदूच्या आरोग्यासाठीही उपवास चांगला असतो. उपवासामुळे नैराश्य आणि मेंदूशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
7 – तणाव ही एक मोठी समस्या आहे जी उपवासाने कमी होऊ शकते. उपवासाच्या दिवशी लोक तणाव कमी करतात आणि राग देखील कमी करतात.
8 – मन स्थिर आणि शांत राहते. यामुळे तुम्हाला चांगली झोप येते आणि तुम्हाला हलके वाटते.