Bisleri water FSSAI: बिस्लेरीच्या पाण्यात कर्करोगकारक घटक? FSSAI ची मोठी कारवाई; कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी
Bisleri water FSSAI: प्रवासात किंवा दैनंदिन जीवनात पिण्याच्या पाण्यासाठी अनेकजण बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्याला पसंती देतात. मात्र, आता याच बिस्लेरीच्या पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bisleri water FSSAI: प्रवासात किंवा दैनंदिन जीवनात पिण्याच्या पाण्यासाठी अनेकजण बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्याला पसंती देतात. मात्र, आता याच बिस्लेरीच्या पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयीन खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या बाटलीबंद पाण्याच्या नमुन्यांमध्ये संभाव्य कर्करोगकारक घटक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरीच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता. या तपासणीत पाण्यामध्ये ब्रोमेट (Bromate) या रासायनिक घटकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. ब्रोमेट हा संभाव्य कर्करोगकारक घटक मानला जातो.
कंपनीने या निष्कर्षाविरोधात अपील केल्यानंतर संबंधित नमुना रेफरल फूड लॅबमध्ये पाठवण्यात आला. मात्र, तेथील तपासणीतही पाण्यामध्ये पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही तपासण्यांमध्ये पाण्याचा नमुना असुरक्षित ठरल्याने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयीन कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काय निष्कर्ष समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
FSSAI ची इतर कंपन्यांवरही कारवाई Bisleri water FSSAI:
दरम्यान, FSSAI ने अन्न आणि संबंधित उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आणखी काही कंपन्यांविरोधात कारवाई केली आहे. उर्मी लाईफ सायन्सेस एलएलपी आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर या दोन कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच वसंत मसाला, टीआयटी-बीआयटी फुड्स इंडिया, मिमान्सा इंडस्ट्रीज आणि आशा कन्फेक्शनरी या कंपन्यांविरोधात न्यायालयीन खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यापूर्वीही बिस्लेरीच्या पाण्याबाबत उपस्थित झाले होते प्रश्न Bisleri water FSSAI:
विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२६ च्या अखेरीस सोशल मीडियावर बिस्लेरीच्या नावाने एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये अस्वच्छ पाणी फिल्टर करून बिस्लेरीच्या बाटल्यांमध्ये भरले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, संबंधित ठिकाण बिस्लेरीचा अधिकृत प्लांट नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते. आता पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीतील निष्कर्षांमुळे पुन्हा एकदा बिस्लेरीच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरू झाली आहे.





