Weather update : शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन.! वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता
या अवकाळी संकटामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Weather update – नागपूरसह राज्यातील अनेक भागांत सध्या अंशतः ढगाळ हवामान असून, ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, प्रामुख्याने कर्नाटक आणि तेलंगणा सीमेला लागून असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील दक्षिण भागांत स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. Weather update
विशेषतः ३० आणि ३१ मार्च २०२६ दरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाचा प्राथमिक अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. Weather update
सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम जोमात आहे. त्यामुळे या अवकाळी संकटामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. Weather update
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन नागरिकांना आणि शेतकऱ्यांना हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील उर्वरित भागातही तापमानात चढ-उतार आणि ढगाळ हवामानाचा प्रभाव दिसून येईल.






