बळीराजाच्या आंदोलनाने हरियाणा सरकारला भरणार धडकी ; ‘या’ मागण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

Farmers Protest in Hariyana। देशात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने सरकारला धडकी भरणार आहे. यावेळी देशातील दोन राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र बाहेर काढले. यात ग्रेटर-नोएडा आणि पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सरकारच्या आश्वासनानंतर नोएडाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तर पंजाब-हरियाणाच्या बळीराजाने किमान आधारभूत किंमत (MSP) सारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रदर्शनाची तयारीही केलीय.
पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीला दिल्लीवर मोर्चा काढण्याची घोषणा केलीय. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने प्रशासनही चिंतेत असल्याचे दिसत आहे. सरकारला पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांची चिंता असल्याने त्यांना तातडीने भेटण्यासाठी मंत्र्यांना पाठवण्यात आले.
शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या ? Farmers Protest in Hariyana।
पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी सरकारकडे त्यांना एमएसपीची हमी द्यावी अशी मागणी केलीय. शेतकऱ्यांना पेन्शनची सुविधा, पीक विमा द्यावा. 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते रद्द करावेत. ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे. याशिवाय स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि लखीमपूर खेरी हिंसाचारात बळी पडलेल्यांना न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
हेही वाचा
Farmers Protest: आक्रमक शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्लीत प्रवेश
कोण करत आहे शेतकऱ्यांचे नेतृत्व ?Farmers Protest in Hariyana।
युनायटेड किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा पंजाब-हरियाणामध्ये आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. या दोन्ही संघटनांसोबत 200 हून अधिक शेतकरी संघटनांचा सहभाग आहे. यावेळी युनायटेड किसान मोर्चानेही आंदोलनात भूमिका स्पष्ट केलेली नाही. जाट समाजाच्या खापांनीही यावेळी आंदोलनात फारसा रस दाखवला नाही. मात्र, त्यानंतरही सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नसल्याचे म्हटले.
काय म्हणाले शेतकरी? Farmers Protest in Hariyana।
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारी २०० हून अधिक शेतकरी संघटनांसोबत ‘दिल्ली चलो’ मोर्चा काढणार असल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे. दिल्लीच्या दिशेने प्रवास ट्रॅक्टर-ट्रॉलींमधून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी खेड्यांमधून गहू आणि इतर खाद्यपदार्थ गोळा करण्यास सुरुवात केलीय. यावरून त्यांचा बराच काळ शिबिर घेण्याचा विचार दिसून येतोय.





