Protesting Farmers March : केंद्र सरकारकडे नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या केल्या होत्या मात्र त्याकाठी सरकारने लक्ष न दिल्याने आता शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. कारण आपल्या विविध मागण्यासाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. आज शेतकरी संसदेला घेरावदेखील घालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मोठ्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी कलम 144 लागू केले आहे. पोलिसांनी ट्रॅफिक ॲडव्हायझरी देखील जारी केली आहे, ज्यामध्ये प्रवाशांना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चमुळे नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील काही मार्गांवर वळवण्याबद्दल सूचना देण्यात आली आहे.
नोएडा आणि ग्रेटर नोएडा डेव्हलपमेंट अथॉरिटीने अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या बदल्यात वाढीव मोबदला आणि भूखंड मिळावेत या मागणीसाठी शेतकरी संघटना डिसेंबर 2023 पासून आंदोलन करत आहेत. आपल्या मागण्यांबाबत राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी संघटनांनी ७ फेब्रुवारीला ‘किसान महापंचायत’ पुकारली असून, ८ तारखेला राजधानी दिल्लीत संसदेपर्यंत निषेध मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
अतिरिक्त डीसीपी (कायदा व सुव्यवस्था) हृदेश कथेरिया म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी ७ फेब्रुवारीला महापंचायत आयोजित करण्याचा आणि ८ फेब्रुवारीला दिल्लीत संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रस्ताव आहे. या काळात विविध संस्थांकडून इतर काही प्रात्यक्षिक कार्यक्रमही प्रस्तावित आहेत. हे पाहता समाजकंटकांकडून शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.