‘शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…’; जितेंद्र आव्हाडांचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा

Jitendra Awhad | कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. कोकाटे यांचा विधानसभा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांवर निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करत कोकाटे यांच्यावर आरोप केला आहे. रोहित पवार यांनी कृषिमंत्री यांचा व्हिडिओ ट्विट करताना जंगली रम्मी पे आओ ना महाराज म्हणत कृषीमंत्र्यांच्या परिस्थितीची खिल्ली उडवली आहे.
यांनतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावर हल्लाबोल चढवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्स हँडलवरून ट्विट करत ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी’, असा खणखणीत टोला कोकाटे यांना लगावला आहे.
शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी… pic.twitter.com/GSzJHqYqP7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 20, 2025
;
बच्चू कडू काय म्हणाले?
“शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. कृषीमंत्रीच रम्मी खेळत आहे. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात त्यांनी विधानसभेत समिती गठीत गेली. शेतकरी आत्महत्या होणार नाही, यासाठी काय उपाययोजना करता येतील, म्हणून ती समिती काम करणार आहे. आमच्या कृषीमंत्र्यांची ही आठवी ते नववी चूक असेल. यांच्याकडून काय अपेक्षा करणार? इकडे शेतकऱ्यांना सांगायचे की, तुम्ही दारू पिता, लग्नात खर्च होतो म्हणून तुमच्यावर कर्ज होत आहे आणि आमचा कृषीमंत्रीच रमी खेळत असेल, तर आमच्या शेतकऱ्यांचे भले काय होईल?,” असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
रोहित पवार पोस्ट –
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा :





