पुणे जिल्हा | मुळशी तहसील आवारात शेतकर्याचे आंदोलन

पौड, (वार्ताहर) – लवळे (ता. मुळशी) येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांना मोजणी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चुकीच्या मोजणीचा फटका बसला आहे.
याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबासह तहसिल कार्यालय मुळशी पौड येथील आवारात आमरण उपोषणास कुटुंबासह बसले आहे.
या उपोषणात त्यांच्या वृद्ध आई सिंधुबाई राऊत, रोहिणी गायकवाड, मीना राऊत, रूपाली कुदळे, तुकाराम राऊत, वृषाली राऊत यांच्याबरोबरच सौम्या राऊत, धनुष्या राऊत, वैष्णव राऊत ही लहान मुलेही सहभागी आहेत.
त्यांच्या उपोषणाला सुनील राऊत, समीर राऊत, दत्तात्रेय राऊत, सोमनाथ राऊत, वैशाली सातव, चंद्रकांत गायकवाड, शंकरराव सातव, समीर गायकवाड, ओमकार राऊत, संदीप कुदळे, स्वाती गायकवाड, वृषाली राऊत मोनिका राऊत, मंदा सातव यांनी पाठिंबा दिला आहे.
लवळे येथील शेतजमिनीची काही वर्षांपूर्वी मोजणी झाली होती. त्या वेळी भूमी अभिलेख कार्यालयाने शेतीचा गटाच्या हद्दीवर शेतकर्याचे घर दाखविले; परंतु हे घर तेथे नसून तेथून काही अंतरावर आहे. असे राऊत यांचे म्हणणे आहे.
मोजणी अधिकार्यांनी हद्दीच्या चुकीच्या खुणा दाखविण्यात आलेल्या आहे. त्यामुळे केलेली मोजणी न्यायालयात दाखवल्याने आमच्या विरुद्ध निकाल लागला आहे.
सरकारी नकाशात या जागांच्या हद्दी अगदी सरळ दाखविल्या गेल्या आहेत; मात्र मोजणी अधिकारी त्यामध्ये मनमानीपणे बदल केल्याचा राऊत यांचा आरोप आहे. पूर्वीपासून जो नकाशा आणि हद्द अस्तित्वात आहे. त्याप्रमाणे निरपेक्ष मोजणी भूमिअभिलेखने करावी. अशी त्यांची मागणी आहे.
अरुण राऊत यांच्या शेताची 2006मध्ये मोजणी झाल्यानंतर न्यायालयाने राऊत यांच्या विरोधात निकाल दिला होता. त्यानंतर त्यांनी हद्द कायम करण्याचा अर्ज केला.
त्यानुसार मोजणी होऊन कायम केलेल्या हद्दी राऊत यांना मान्य नाहीत. याबाबत आक्षेप असल्यास त्यांनी नियमित मोजणी किंवा वरिष्ठ कार्यालयात अपील करून कायदेशीर मार्गाने न्याय मागावा. -स्वप्ना पाटील, उपअधीक्षक भूमी अभिलेख मुळशी, पौड





