Jagjit Singh Dallewal : शेतकरी नेते डल्लेवाल पतियाळा रुग्णालयात दाखल

जालंधर : शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांना रविवारी सकाळी जालंधर कॅन्ट (आर्मी एरिया) येथील पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊसमधून गुप्तपणे पतियाळा येथील राजिंदर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डल्लेवाल यांना ताब्यात घेतल्यानंतर, पोलिसांनी त्यांना प्रथम जालंधर येथील पिम्स रुग्णालयात नेले आणि नंतर माध्यमांची गर्दी लक्षात घेता, त्यांना किसन कॅन्टमधील पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊसमध्ये हलविण्यात आले.
तीन दिवस या विश्रामगृहात राहिल्यानंतर, आज सकाळी कोणाच्याही नकळत डल्लेवाल यांना पतियाळा येथील राजिंदर रुग्णालयात हलवण्यात आले. तथापि, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या त्यांना राजिंदर रुग्णालयात का ठेवण्यात आले याबद्दल कोणतेही स्पष्ट विधान जारी केलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ महिन्यांनंतर पोलिसांनी शेतकऱ्यांकडून पंजाब हरियाणा सीमा रिकामी केली. यावेळी, केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या बैठकीनंतर लगेचच, शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर आणि जगजित सिंग डल्लेवाल यांना मोहाली येथून ताब्यात घेण्यात आले. तिथून ताब्यात घेतल्यानंतर, डल्लेवालना जालंधरमधील पिम्स रुग्णालयात आणण्यात आले.





