“अमेरिकेने भारताशी संबंध मजबूतीसाठी २५ वर्षे घालवली, पण ट्रम्पने मातीत…” ; झकेरियाचा मोठा दावा

Farid Zakaria। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर सर्वाधिक कर लादला आहे, त्यानंतर अमेरिका-भारत संबंध रसातळाला पोहोचले आहेत. अमेरिकन नेत्यांनी भारतावर केलेल्या टिप्पण्यांमुळे संबंध तणावपूर्ण होत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राजकीय समालोचक आणि लेखक फरीद झकारिया यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी यावेळी बोलताना,”भारताशी संबंध बिघडवणे ही त्यांच्या परराष्ट्र धोरणातील मोठी चूक ठरेल” असे म्हणत ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली.
सोशल मीडियावरील एका व्हिडिओमध्ये फरीद झकारिया यांनी ट्रम्प आणि त्यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली. त्यांनी या व्हिडीओमध्ये, “बिल क्लिंटन प्रशासनाच्या काळात अमेरिका-भारत संबंधांमध्ये सुधारणा सुरू झाली. गेल्या २५ वर्षांत हे संबंध सतत सुधारत आहेत. डोनाल्ड ट्रम्पच्या भूमिकेने आता गेल्या ५ अमेरिकन राष्ट्रपतींच्या प्रशासनाच्या धोरणांना उलटे केले आहे.” असे म्हटले आहे.
“बिल क्लिंटनच्या भारत भेटीने एक नवीन पुढाकार” Farid Zakaria।
झकारिया यांनी आपल्या व्हिडिमध्ये, “२००० मध्ये बिल क्लिंटन यांनी भारताला भेट देऊन एक नवीन पुढाकार घेतला. त्यानंतर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात भारताशी संबंध सुधारण्यासाठी बरेच काम केले गेले. चीनच्या वाढत्या शक्तीमुळे बुश प्रशासन भारताच्या जवळ आले. त्यावेळी बुश यांना असे वाटले की भारत हा चीनचा सर्वात महत्त्वाचा प्रतिस्पर्धी असू शकतो. जरी भारताचा अणुकार्यक्रम संबंधांमध्ये अडथळा बनत होता, परंतु त्यावर मात करण्यासाठी बुश प्रशासनाने ऐतिहासिक अणु कराराची ऑफर दिली, ज्यामुळे अमेरिकेचे भारतापासूनचे वेगळेपण संपले” असे त्यांनी म्हटले.
The biggest strategic mistake of President Trump’s second term so far?
Trump’s stunning turn against India.
My take: pic.twitter.com/yX272CVf4z
— Fareed Zakaria (@FareedZakaria) August 17, 2025
“ओबामा आणि बायडेन यांच्या काळात संबंध अधिक मजबूत” Farid Zakaria।
बराक ओबामा यांनीही भारताशी संबंध आणखी पुढे नेले, तर ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारताला मित्र म्हणून पाहिले. जो बायडेन यांनी संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात भारतासोबत चांगले सहकार्य प्रस्थापित केले. बायडेन यांच्या काळात, भारताने लढाऊ विमानांपासून ते संगणक चिप्सपर्यंत सर्व काही बनवण्यासाठी अमेरिकेसोबत काम करण्याची योजना आखली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यानंतर यावेळी परिस्थिती खूप बदललेली दिसते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत घोषित करून तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे, तर सत्य हे आहे की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारत २०२८ पर्यंत जर्मनीला मागे टाकून अमेरिका आणि चीननंतर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.





