अमिताभ बच्चन यांच्याकडून फराह खानला मिळाली ‘ही’ खास भेट; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Farah Khan: सोशल मीडियावर सध्या फराह खानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अत्यंत आनंदित दिसतेय, कारण तिला खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून एका खास भेट मिळाली आहे. ही भेट म्हणजे बिग बी यांनी स्वतः हाताने लिहिलेलं पत्र !
ही गोष्ट खूपच गंमतीशीर आहे. फराह खानने एक यूट्यूब व्हिडीओ शूटदरम्यान मजेत अमिताभ बच्चन यांच्याकडे त्यांच्या हाताने लिहिलेलं पत्र मागितलं. मात्र काही तासांतच म्हणजे रात्री 3.13 वाजता खुद्द अमिताभ बच्चन यांनी हे पत्र लिहून फराह खानपर्यंत पोहोचवलं. फराहने हे पत्र पाहून आनंदाने भरून येत ‘हे माझं वर्षच सुंदर केलं’ असं म्हटलं.
View this post on Instagram
फराहने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रसंग सांगितला. ती एक व्हिडीओ शूट करत होती, जो अभिनेत्री राधिका मदानच्या घरी झाला. तिथेच तिला अमिताभ बच्चन यांनी राधिकाला पाठवलेलं एक खास पत्र मिळालं, आणि त्यानंतरच तिने स्वतःसाठी असं एक पत्र मागितलं. राधिकाला विशेष धन्यवाद देताना फराहने त्या पत्राला “खूप खास” म्हटलं आहे.
या सुंदर आणि दिल खुश करणाऱ्या प्रसंगामुळे इंटरनेटवर याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांचं हे सोज्वळ आणि मन जिंकणारं व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात अधोरेखित झालं आहे.





