Actor Gulshan Devaiah : कांतारा सिनेमात प्रसिद्ध बॅालिवूड अभिनेत्याचे एण्ट्री; दमदार लूकने वेधले लक्ष, उत्सुकता शिगेला!

Actor Gulshan Devaiah : भारतीय सिनेमा इंडस्ट्रीतील मास्टरपीस सिनेमा ठरलेला कांताराचा प्रीक्वल रिलीजसाठी सज्ज आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टीने सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्याचा एक रॅपअप व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर या सिनेमातील एका अभिनेत्रीचा लूक रिलीज करण्यात आला होता. आता या सिनेमात प्रसिद्ध बॅालिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री झाली आहे.
२०२२ मध्ये रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर धुराळा घालत प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली. या सिनेमानंतर याचा प्रीक्वल येणार असल्याची घोषणा स्वतः रिषभ शेट्टीने केली होती. २ अॅाक्टोबरला कांतारा चॅप्टर १ प्रीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेता गुलशन देवैय्या दिसणार आहे. त्याचा लूक शेअर करण्यात आला आहे.
होंबळे फिल्म्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती देण्यात आली आहे. या सिनेमात गुलशन देवैय्या कुलशेखरची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये तो एका दमदार लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावर मुकुट आहे आणि तो राजासारखा पोशाख घालून सिंहासनावर आरूढ झालेला दिसत आहे.
View this post on Instagram
गुलशन देवैय्याच्या लूकला नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. गुलशनला लूक पाहून प्रेक्षकांची सिनेमाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. एका यूजरने लिहिले, ‘ आमचा गुल्लू कुलशेखर म्हणून प्रसिद्ध झाला आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, ‘छान कास्टिंग.’ एका युजरने लिहिले आहे, ‘तुम्हाला चित्रपटाचा भाग असल्याचे पाहून आनंद झाला.’





