जाळ अन् धूर संगटचं…! ‘कांतारा चॅप्टर १ ‘ची पहिल्याच दिवशी BOX OFFICE वर छप्परफाड कमाई

Kantara Box Office : दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी याची प्रमुख भूमिका असलेला तसेच त्याने दिग्दर्शित केलेला कांतारा चॅप्टर १ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर सिनेमाविषयी आपली मत व्यक्त करणारी पोस्टर लिहित आहेत. सिनेमाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया देत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी कांतारा चॅप्टर १ सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर धुराळा उडवून दिला आहे.
२०२२ मध्ये कांतारा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने सिनेमाने मोठी कमाई करत अनेक रेकॅार्ड मोडले होते. हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. यानंतर ऋषभ शेट्टीने एक घोषणा केली होती. या सिनेमाचा पुढचा भाग येणार, पण तो प्रीक्वल असणार. म्हणजेच आता रिलीज झालेला कांतारा चॅप्टर १ हा सिनेमा कांतारा सिनेमाचा प्रीक्वल आहे.
या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. कांताराने पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिस कलेक्शनमध्ये मोठी कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ने प्रदर्शनाच्या दिवशी ६० कोटी कमावले आहेत. थोडक्यात कांताराचं हे ओपनिंग डे कलेक्शन असून या विकेंडला सिनेमा किती गल्ला बॅाक्स अॅाफिसवर गोळा करतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कांतारा: चॅप्टर १’ सिनेमाची कथा कर्नाटकमधील कदंब काळावर आधारित आहे. कदंब हे कर्नाटकाच्या काही भागांचे महत्त्वाचे शासक होते आणि त्यांनी या क्षेत्राच्या वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो काळ भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो. हाच काळ या सिनेमात दाखविण्यात आला आहे.
हेही वाचा : शेअर बाजार पुन्हा कोसळला ! सेन्सेक्स २९९ अंकांनी घसरला ; निफ्टी ५० देखील खाली





