प्रसिद्ध अभिनेत्रीला फेस करावी लागली क्रिटिकल कंडिशन; म्हणाली “मी दरवाजा बंद करून धसाधसा रडायची…” नेमकं काय झालं होतं?

Tripti Dimri : २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर सिनेमाने एका बॉलिवूड अभिनेत्रीला मोठी प्रसिद्धी मिळाली. या सिनेमाने तिने एका सुपरस्टारसोबत एक इंटिमेट सीनमध्ये केला होता. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, त्यानंतर तिने स्वतः खोलीत कोंडून घेतले आणि ती धसाधसा रडायची. याचं नेमकं कारण काय होतं. याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
या अभिनेत्रीचं नाव आहे तृप्ती डिमरी. जिने २०१७ मध्ये बॅालिवूडमध्ये पदार्पण केलं. तृप्तीने ‘पोस्टर बॉईज’ या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तृप्तीला रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या “अॅनिमल” सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. हा सिनेमा तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला आणि ती रातोरात स्टार झाली.
डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत होते. तर तृप्ती डिमरी हिचं पात्र देखील महत्वाचं होतं. तिने झोया रियाजीची भूमिका साकारलेली होती. याच सिनेमात तृप्तीने रणबीरसोबत इंटिमेंट सीन दिले होते. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. मात्र, यानंतर तृप्तीवर इंटिमेंट सीनवरून बरीच टीका करण्यात आली होती.
एका मुलाखतीत अभिनेत्रीने याविषयी खुलासा करत या सगळ्याला कंटाळून ती स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेऊन धसाधसा रडायची, असं तिने सांगितलं. ती पुढे म्हणाली, “मी खूप रडले. लोक जे लिहित होते त्यामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. काही टिप्पण्या खूपच अश्लील होत्या.” असं तिने सागितलं.





