रश्मिका मंदान्नासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवरकोंडाने रिलेशनशिप केलं कन्फर्म

Vijay Deverakonda Confirms Relationship | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या डेटींगच्या अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. मात्र दोघांनी वारंवार एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. रश्मिकासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवरकोंडाने आता मोठा खुलासा केला आहे. विजयने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.
विजय देवरकोंडानं ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “प्रेमात पडताना कसं वाटतं हे मला माहित आहे. पण, बिनशर्त प्रेम माहित नाही. कारण प्रेम अपेक्षांसह येते आणि त्यामुळे माझे प्रेम बिनशर्त नाही. मला वाटतं सगळंच ओव्हर-रोमँटिक झाले आहे. बिनशर्त प्रेमाची अपेक्षा करणे योग्य आहे की नाही हे देखील मला माहित नाही.”
यावेळी विजयने तो त्याच्या एका सह-अभिनेत्रीला डेट करत असल्याचे देखील स्पष्ट केले. तो म्हणाला, “मी डेटवर जात नाही. एखाद्याला खूप दिवसांपासून ओळखून आणि मैत्री करूनच मी बाहेर जातो. मी ३५ वर्षांचा आहे, मी सिंगल राहीन असे तुम्हाला वाटते का?”, असे त्याने म्हंटल्याने रश्मिकासोबतच्या त्याच्या नात्यांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विजय देवराकोंडा लग्नाबाबत म्हणाला, “लग्न करणे हे महिलांसाठी खूप आव्हानात्मक आहे. लग्न एखाद्याच्या करिअरच्या आड येऊ नये. स्त्रियांसाठी विवाह करणे कठीण आहे. तुम्ही कोणत्या व्यवसायात आहात यावरही ते अवलंबून असते.’
विजयच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो तेलुगू चित्रपट ‘VD12’ आणि ‘जेजीएम-जण गण मन’ या पुरी जगन्नाथ यांच्यासोबतच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. विजय आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी ‘लायगर’ चित्रपटातही एकत्र काम केले होते.





