परी म्हणू की सुंदरा..! हिरव्याकंच साडीत खुललं ‘प्राजक्ता’चं निखळ सौंदर्य

Updated On:
Photo 1

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयचं नव्हे तर, प्राजक्ता आपल्या फॅशन सेन्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घालत असते. तसेच ती दररोज आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ताने हिरव्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती किलर पोज देताना दिसत आहे. हिरव्या रंगाच्या साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत असून या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने पारंपारिक दागिने परिधान केले आहेत. हातात हिरव्या बांगड्या आणि नाकात नथ या लूकमध्ये अभिनेत्री अत्यंत मनमोहक दिसत आहे.

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या याच फोटोंवर चाहते देखील फिदा झाले आहेत. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून ते प्राजक्ताच्या या लूकला पसंती दर्शवत आहेत. सध्या सगळीकडे फक्त प्राजक्ताच्या याच फोटोंची चर्चा होताना दिसत आहे. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?