आदित्य ठाकरेंना फडणवीसांनी सुनावले,’शिवसेनेची अवस्था ही ‘झेड टीम’ प्रमाणे,आपलं ठेवायचं झाकू आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून…’

Updated On:

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या गुढीपाडव्याच्या महामेळाव्याच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेनेसकट महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर जी टीका केली, त्यानंतर या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या या आरोपांचे महत्त्व कमी करण्याच्या उद्देशाने “राज ठाकरे ही भाजपचीच  ‘सी टीम’ असल्याची टीका  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती.

या टीकेवर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला भाजपची ‘सी टीम’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना सुनावल आहे. ते म्हणाले,’शिवसेना पक्षाने आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कितवी टीम झालोय, हे पाहावे. एक मुख्यमंत्रीपद घेऊन आपण संपूर्ण शिवसेना पक्षाची काय अवस्था केलेय, हे त्यांनी पाहावे. शिवसेनेची अवस्था ही झेड टीम प्रमाणे झालेय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी पहिले आपल्या पक्षाकडे पाहावे. ‘आपलं ठेवायचं झाकू आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून, हा प्रकार बंद करा’ असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना चांगलेच सुनावले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा