मुंबई – दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका काल देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्याला आज उद्धव ठाकरेंनी चांगल्याच शब्दांत उत्तर दिल असल्याचं दिसून आलं.
“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या याच इशाऱ्याला फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. सध्या त्यांचं हे ट्विट चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले? वाचा…
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 24, 2023
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे.! ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
– सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
– मुंबईला कुणी लुटले यावर…
– मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
– मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
– 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…’