कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येवरून फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र; म्हणाले…

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अशातच आज महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून मुख्यमंत्री हे नवखे असून त्यांना प्रशासनाचा कोणताही अनुभव नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना फडणवीस यांनी ही टीका केली आहे. ‘लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यापासूनच महाराष्ट्र सरकारने निर्णय घेण्यामध्ये चुका केल्या असून याचीच परिणीती महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. सद्यस्थितीत महाराष्ट्र हा देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता येथील परिस्थिती राज्य सरकारच्या हाताबाहेर गेल्याच दिसतंय.’ या भाषेत फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेने भाजपपासून फारकत घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला होता. यानंतर मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली होती. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोणतेही संविधानिक पद भूषवले नसल्याने भाजपतर्फे ठाकरे यांच्यावर यापूर्वीही प्रशासकीय अनुभव नसल्याची टीका झाली आहे.
Maharashtra is the most affected state&it seems situation in Mumbai has gone out of the hand of the govt. The govt made strategical errors since the beginning of the first lockdown. The CM is new and has no administrative experience: Devendra Fadnavis, BJP leader&former Maha CM pic.twitter.com/yOXQ5NXGXr
— ANI (@ANI) May 21, 2020





