Chagan Bhujabal : फडणवीस-भुजबळ यांचा एकत्र गाडीतून प्रवास ; राजकीय वर्तुळात चर्चांना आले उधान

पुणेः आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील चाकणमध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रम सोहळ्याला छगन भुजबळ आणि शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच गाडीमधून प्रवास केल्याने चर्चांणा उधान आले आहे.
साताऱ्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ उपस्थित आहेत. यावेळी दोघेही एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी दाखल झाले. फडणवीस ड्रायव्हर बाजूच्या सीटवर, तर छगन भुजबळ मागच्या सीटवर बसले असल्याचे दिसून आले. सरकारमध्ये मंत्री मंडळात स्थान न दिल्याने भुजबळांनी आपली नाराज उघडपणे बोलून दाखवली होती. अशातच त्यांनी फडणवीस यांच्या गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
चर्चांनी पकडला पुन्हा जोर
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा केली जात होती. फडणवीस यांच्यासोबत प्रवास केल्याने या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.





