Ruiz Unbeaten Streak : ‘हा’ खेळाडू आहे की विजयाचा ताईत? ४९ सामन्यांपासून स्पेनला हारू न देणाऱ्या ‘या’ ३० वर्षीय मिडफिल्डरचा फुटबॉल जगतात डंका
Ruiz Unbeaten Streak : स्पेनच्या एका स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये एकही सामना न हरण्याचा जादुई आणि ऐतिहासिक सिलसिला आता थेट ४९ व्या सामन्यापर्यंत पोहोचला आहे.

Fabian Ruiz Unbeaten Streak Spain Reaches FIFA World Cup 2026 Final : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) मध्ये स्पेनच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत थेट अंतिम फेरीत (Final) धडक मारली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनने फ्रान्सचा २-० असा पराभव करत जेतेपदाच्या सामन्याचे तिकीट पक्के केले. या दिमाखदार विजयासोबतच स्पेनच्या एका स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये एकही सामना न हरण्याचा जादुई आणि ऐतिहासिक सिलसिला आता थेट ४९ व्या सामन्यापर्यंत पोहोचला आहे.
कोण आहे हा ‘अजेय’ खेळाडू?
फुटबॉल जगतात सध्या कौतुकाचा विषय ठरलेला हा खेळाडू म्हणजे स्पेनचा ३० वर्षीय स्टार मिडफिल्डर फाबियन रुइझ (Fabian Ruiz) होय. ‘ला रोजा’ (La Roja) या नावाने प्रसिद्ध असलेल्या स्पेनच्या राष्ट्रीय संघासाठी रुइझने आतापर्यंत एकूण ४९ अधिकृत आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो मैदानावर असताना आजतागायत स्पेनला एकाही सामन्यात पराभवाचा चव चाखावी लागलेली नाही.
📌 Dato para la historia: Fabián Ruiz mantiene el invicto con España tras 49 apariciones internacionales 🇪🇸
¡INCREÍBLE! 🔥 pic.twitter.com/cEpCWJWE7A
— Paris Saint-Germain (@PSG_espanol) July 15, 2026
उपलब्ध आकडेवारीनुसार, रुइझने खेळलेल्या ४९ सामन्यांपैकी स्पेनने ३४ सामने जिंकले असून १५ सामने अनिर्णित (Draw) राहिले आहेत. आता विश्वचषकाचा अंतिम सामना हा त्याचा कारकिर्दीतील ५० वा सामना ठरणार असून, यात त्याचा हा अनोखा विक्रम कायम राहतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
क्वाटर फायनलचा हिरो अन् स्पेनचा नवा विक्रम!
Fabian Ruiz’s first half vs. France by numbers:
100% duels won
90% pass accuracy
13 carries
5 passes into the final third
3 ball recoveries
2 chances createdDominant in the middle third. 🔝 pic.twitter.com/b7C5bFKNB5
— Statman Dave (@StatmanDave) July 14, 2026
यंदाच्या विश्वचषकातही फाबियन रुइझचा फॉर्म अप्रतिम राहिला आहे. बेल्जियमविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या उपांत्य पूर्व (Quarter Final) सामन्यात रुइझनेच ३० व्या मिनिटाला एक उत्कृष्ट गोल डागत स्पेनला १-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली होती. रुइझचा हा वैयक्तिक विक्रम म्हणजे स्पेनच्या सध्याच्या सुवर्णकाळाचा एक भाग आहे. स्पेनच्या संघाने मार्च २०२४ पासून आतापर्यंत (नियमित ९० मिनिटांच्या खेळात) सलग ३७ सामन्यांमध्ये अजिंक्य राहण्याचा स्वतःचाच जुना ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आहे.





