Pune: शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ
Updated On:

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्यापही अर्ज भरले नसतील त्यांनी १५ डिसेंबर अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अर्ज भरण्याबाबत सुधारित वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे.




