पुणे | पुणे ते नागपूर दरम्यान ३० फेऱ्यांसाठी विशेष ट्रेनला मुदतवाढ
Updated On:

पुणे, – मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन ३० फेऱ्यांसाठी विशेष ट्रेन्सच्या सेवेचा विस्तार वाढवला आहे. नागपूर-पुणे (ट्रेन ०२१४४) ही साप्ताहिक विशेष ट्रेन आता 15 फेब्रुवारीऐवजी ३० मे २०२४ पर्यंत(१५ फेऱ्या) वाढविण्यात आली आहे.
तर पुणे-नागपूर (ट्रेन ०२१४३) ही साप्ताहिक गाडी विशेष ट्रेन १६ फेब्रुवारीपर्यंतची आता ३१ मे २०२४ (१५ फेऱ्या) पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. तसेच या गाड्यांची वेळ, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.





