पुष्पा २ हा सिनेमा आतापर्यंतच्या अनेक सिनेमांचे रिकार्ड ब्रेक करणारा सिनेमा ठरला आहे. त्याच्या कमाईचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. निर्मात्यांनी ही कमाई आणखी वाढवण्याचा मार्ग शोधला असून आता काही नवीन दृश्यांसह पुष्पा २ पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
नव्या दृष्यांना पुष्पा २ सिनेमात अॅड केल्याने हा सिनेमा पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. १८ जानेवारीला देशभरातील अनेक थिएटर्समध्ये पुष्पा २ सिनेमाचे एक्सटेंडेट व्हिर्जन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. थिएटर्समध्ये ‘पुष्पा 2’च्या नव्या दृश्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सुकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या पुष्पा २ ने भारतात केवळ 45 दिवसांत तब्बल 1225.65 कोटींची कमाई करत नवा इतिहास रचला आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने सुमारे 806.4 कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. जगभरातून या सिनेमाने 1,731.6 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. ज्यांनी आधी ‘पुष्पा 2’ पाहिला आहे, तेही या सिनेमात जोडलेले नवीन सीन्स पाहण्यासाठी सिनेमा पाहिला जात आहेत.
पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ मध्ये तीन नवीन दृश्ये जोडण्यात आली आहेत. इंट्रो फाईट सीन्समध्ये काही नवीन सीन्स जोडण्यात आले आहेत. या सीन सिनेमाचा टोन सेट करतो. याशिवाय शेखावत जेव्हा लाल चंदनाच्या शोधात जातो तेव्हाचे काही सीन या क्रमात जोडण्यात आले आहेत.
सिनेमात दाखवण्यात आलेल्या देवीच्या गाण्यामध्ये देखील काही नवीन गोष्टी अॅड करण्यात आलेल्या आहेत. प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्कंठावर्धक करणारे दृश्य म्हणजे देवीचे गाणं आहे. या दृश्यामध्ये देखील आणखी वाढ करण्यात आलेली आहे. याच्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत.