Iran gas leak : इराणमधील स्फोट गॅस गळतीमुळेच; ६ जण ठार तर, १४ जखमी
इराणच्या बंदर अब्बास या पोर्टमधील एका इमारतीत काल झालेला स्फोट गॅस गळतीमुळे झाला होता.
Updated On:

Iran gas leak : इराणच्या बंदर अब्बास या पोर्टमधील एका इमारतीत काल झालेला स्फोट गॅस गळतीमुळे झाला होता, असे निष्पन्न झाले आहे. या स्फोटात ६ जण ठार झाले आणि अन्य १४ जखमी झाले होते.
इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या कमांडरला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवून आणला गेला होता, असा दावा सोशल मीडियावर केला गेला होता. पण स्थानिक निमसरकारी वृत्तसंस्थेने हा दावा फेटाळला आहे. या स्फोटाशी इस्रायलचा काहीही संबंध नसल्याचे इस्रायलच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले आहे.
बंदर अब्बास हे इराण आणि ओमान दरम्यानच्या महत्त्वाच्या सागरी मार्गावर असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर वसलेले आहे. या मार्गातून जगभरातील सागरी वाहतूकीच्या एकपंचमांश वाहतूक होते.





