Amravati News : अमरावती ZPच्या औषधी भांडारगृहात लाखोंचा कालबाह्य औषधसाठा; FDAची कारवाई
Amravati News : अमरावती जिल्हा परिषदेच्या (ZP) आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Amravati News : अमरावती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडारगृहात लाखो रुपयांचा औषधसाठा कालबाह्य झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामीण भागातील सामान्य आणि गरजू रुग्णांना मोफत वाटप करण्यासाठी उपलब्ध झालेला हा औषधसाठा वेळेत वितरित न झाल्याने कालबाह्य झाल्याची तक्रार औषध प्रशासनाकडे करण्यात आली होती. (Amravati News)
तक्रारीची दखल घेत औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या औषधी भांडारगृहाची तपासणी केली. सहआयुक्त अनिल माणिकराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासणीत एका अडगळीच्या खोलीत मोठ्या प्रमाणात कालबाह्य औषधसाठा आढळून आला. (Amravati News)
एकीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे लाखो रुपयांची औषधे अडगळीत पडून कालबाह्य झाल्याने औषध व्यवस्थापन आणि वितरणाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Amravati News)
कालबाह्य औषधांची नियमानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फार्मासिस्ट दिनीच हा कालबाह्य औषधसाठा आढळल्याने प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. (Amravati News)





