चीनमध्ये महागड्या विवाह समारंभांवर बंदी

बीजिंग – गेल्या काही वर्षांमध्ये चीनमधील जनन दर झपाट्याने घटला असल्याने लोकसंख्या वाढीसाठी चीन सरकारकडून सतत नवनवीन उपायांची योजना केली जात आहे याच उपायांचा एक भाग म्हणून आता चीनमध्ये महागड्या विवाहासमारंभांवर बंदी घालण्यात आली आहे चीनमधील पारंपारिक विवाह समारंभाचा भाग असलेली ब्राईड प्राईस ही हुंडा सदृश परंपराही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीन सरकारने आता जाणीवपूर्वक लोकसंख्या वाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत पण गेल्या काही वर्षांमध्ये चीनमधील विवाह समारंभ महाग आणि सर्वसामान्यांना न परवडणारे होत असल्याने अनेक जोडप्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे चीनमधील कोणताही सर्वसाधारण विवाह समारंभ पारंपरिक पद्धतीने करण्याचे ठरल्यास वर्षभर सर्व विधी सुरू असतात चीनमधील परंपरेप्रमाणे मुलाकडून मुलीला हुंडासदृश काही रक्कम द्यावी लागते त्याला ब्राईड प्राईस असे म्हटले जाते पण ही रक्कम अनेकदा मोठी असल्यामुळे अनेक तरुण लग्न न करण्याचा निर्णय घेतात म्हणून चीनमध्ये जननदर घटला आहे.
आता चीन सरकारने या महागड्या विवाह समारंभावर बंदी घातली असून ही ब्राईड प्राईसची परंपराही मोडीत काढली आहे एवढेच नाही तर लग्न न करताही कोणी मुलाला जन्म दिला तर त्याला अधिकृत दर्जा देण्यात येणार आहे लिव्ह इन पद्धतीने एकत्र राहणाऱ्या जोडप्यांना सुद्धा मुलांना जन्म देण्याचा अधिकार देण्यात आला आहे चीनमधील ही आगळीवेगळी हुंडा प्रथा आणि महागड्या विवाहाची परंपरा या विरोधात सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा आवाज उठवला होता.
त्यानंतर चीन सरकारने त्याची दखल घेतली आहे याचाव्ह एक भाग म्हणून नुकत्याच साजरा करण्यात आलेला महिला दिनी चीनमध्ये अनेक ठिकाणी सामूहिक विवाहंचे आयोजन करण्यात आले होते चीनमध्ये आता लोकसंख्या वाढीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नवविवाहित जोडप्याला 30 दिवसांची पगारी रजा देण्यात येते त्याशिवाय लग्नाच्या वेळी त्यांना सरकारतर्फे सुद्धा काही रक्कम भेट म्हणून देण्यात येते एवढेच नाही आणि पत्नी या दोघांनाही मॅटरनिटी लिव्हची मंजुरी देण्यात आली आहे.





