एक्झिट पोल म्हणजे ‘पैसा फेको तमाशा देखो’; संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut On Exit Polls | लोकसभा निवडणुकीचे 19 एप्रिलपासून सुरू झालेले मतदान १ जून रोजी सातही टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकाल येत्या 4 जून रोजी मंगळवारी जाहीर होणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यातून एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असून पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“कालच्या एक्झिट पोलमध्ये ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानमध्ये २६ जागा आहेत. एक्झिट पोल बनवणाऱ्या १०० कंपन्या आहेत. ते फुकट काम करत नाहीत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं त्याचं काम असते. एक्झिट पोल कंपनीने त्याठिकाणी भाजपला ३३ जागा दाखवल्या. मला वाटलं होतं हे सर्व मिळून भाजपला ८०० ते ९०० जागा देतील. मोदी ध्यानाला बसले होते, कॅमेरा लावण्यात आले होते. त्यांनी साधना, तपस्या केली त्यामुळे ३६०-३७० काहीच नाही,”असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.
एक्झिट पोल हा कॉर्पोरेट धंदा Sanjay Raut On Exit Polls |
पुढे ते म्हणाले, “अत्यंत फ्रॉड असे एक्झिट पोल आहेत. एक्झिट पोल हा कॉर्पोरेट धंदा आहे. ध्यानाला बसून जागा जिंकता येत नाहीत.
एक्झिट पोलवर आमचा अजिबात विश्वास नाही. कालचा एक्झिट पोल ‘पैसा फेको तमाशा देखो’ असा पोल आहे. राज्यात कोण जिंकतंय, का जिंकतंय हे आम्हाला माहिती आहे. इंडिया आघाडी सरकार बनवणार. आम्हाला २९५ ते ३१० इतक्या जागा मिळतील. लोकांमधून घेतलेला हा कल आहे. आम्ही सरकार बनवत आहोत. मोठे पक्ष अशा एक्झिट पोल कंपन्यांना पैसे देतात. त्यामुळे आमचा यावर विश्वास नाही.”
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ पेक्षा जास्त जागा मिळतील. ३० तर जागा नक्कीच मिळतील. यूपीमध्ये इंडिया आघाडी ३५ ते ४० जागा जिंकेल, बिहारमध्ये आरजडी १६ जागा जिंकेल. ठाकरे गटाचा १८ जागांचा आकडा कायम राहील. काँग्रेसचा राज्यात चांगला परफॉर्मन्स असेल. सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी त्यावर बोलणारच आहे. राज्यात निकाल धक्कादायक लागणार नाही. इंडिया आघाडीच सरकार बनवेल, जे लोकांच्या मनात आहे, तोच निकाल महाविकास आघाडीबद्दल लागेल,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. Sanjay Raut On Exit Polls |
हेही वाचा:





