टोल टॅक्सपासून मुक्ती! Google मॅपचं नव्या फीचरमुळे होणार हजारो रुपयांची बचत

नवी दिल्ली – अनेक महामार्गांवर टोल टॅक्समध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. प्रवासादरम्यान टोल प्लाझावर टॅक्स देऊन थकला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता गुगल मॅपने आपल्यासाठी एक भन्नाट फिचर आणलं असून त्यामुळे आपली टोल टॅक्सपासून बचत होणार आहे.
Google ने आपल्या लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप Google Maps मध्ये काही नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे टोल टॅक्सचा खर्च. या फीचरद्वारे युजर्सला प्रवास सुरू करण्यापूर्वी वाटेत टोलवर किती कर भरावा लागेल हे पाहता येईल. यासाठी गुगलने स्थानिक टोल प्राधिकरणाशी भागीदारी केली आहे. नवीन सुविधेद्वारे, तुम्हाला टोल मार्ग निवडायचा की नॉन-टोल मार्ग निवडायचा हे तुम्ही ठरवू शकाल.
टोल टॅक्सच्या खर्चाची कल्पना येण्यासाठी गुगल मॅप्स काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे परीक्षण करेल. ही किंमत टोल पास किंवा पेमेंटच्या इतर कोणत्याही पद्धतीवर, आठवड्याचा दिवस आणि टोल पास करण्याची अंदाजे वेळ यावर अवलंबून असेल. भारतासह यूएस, जपान आणि इंडोनेशियामधील सुमारे 2,000 टोल रस्त्यांसाठी या महिन्यात Android आणि iOS वर टोलच्या किमती सुरू होणार आहे.
एवढेच नाही तर तुम्हाला टोल टाळायचा असेल तर गुगल मॅप तुम्हाला पर्यायी मार्गही सांगेल. ज्यामध्ये तुम्हाला टोलमुक्त मार्गाचा पर्याय सांगितला जाईल. मात्र, यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये टोल टॅक्स टाळा, हा पर्याय सक्रिय करावा लागेल.





