Bhor : राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136 शाखा भोरची कार्यकारिणी बिनविरोध
Bhor: राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136, शाखा भोरच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Bhor : राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136, शाखा भोरच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
निवडणुकीत अध्यक्षपदी नवनाथ झोळ, मानद अध्यक्षपदी शिल्पा कांबळे, सचिवपदी महेश कालेकर, उपाध्यक्षपदी परमेश्वर खटके, महिला उपाध्यक्षपदी स्वाती महांगरे, कोषाध्यक्षपदी अशोक ढवळे, कार्याध्यक्षपदी भूषण पुरोहित तसेच प्रसिद्धीप्रमुखपदी सुनील भोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून योगेश चव्हाण, विजय गेजगे, अनिल अभंग, ज्योती जाधव, अंजना खुडे आणि स्वाती धुमाळ यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी जिल्हा शाखेकडून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मदनजी शेलार, शहाजी चव्हाण, नितीन डुके, ईरना ऊनदे आणि राज अहमद मुरमे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी एकमताने पाठिंबा दर्शविला.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रभावीपणे पाठपुरावा करून संघटनेचे कार्य अधिक गतिमान केले जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विविध स्तरांतील अधिकारी, कर्मचारी व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
नवनिर्वाचित कार्यकारिणी :
अध्यक्ष – नवनाथ झोळ
मानद अध्यक्ष – शिल्पा कांबळे
सचिव – महेश कालेकर
उपाध्यक्ष – परमेश्वर खटके
महिला उपाध्यक्ष – स्वाती महांगरे
कोषाध्यक्ष – अशोक ढवळे
कार्याध्यक्ष – भूषण पुरोहित
प्रसिद्धीप्रमुख – सुनील भोकरे
कार्यकारिणी सदस्य – योगेश चव्हाण, विजय गेजगे, अनिल अभंग, ज्योती जाधव, अंजना खुडे, स्वाती धुमाळ.





