करमाळ्यात खळबळ…! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर प्राणघातक हल्ला

Mahesh Chivte : करमाळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या भावावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महेश चिवटे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून आज सकाळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे शेतात गेल्यावर झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आहेत.
महेश चिवटे यांना करमाळा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा सुपारी घेऊन करण्यात आला असून दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांची नावे त्यांनी घेतली आहेत. दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते.
काय म्हणाले महेश चिवटे?
महेश चिवटे यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. नेमकं आज सकाळी काय घडलं याविषयी त्यांनी सांगितलं आहे. आज ते त्यांच्या शेतातून येत असताना हा हल्ला करण्यात आला. रश्मी बागल व दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने माझी गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी काठ्याने खाली पाडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याचं चिवटे यांनी सांगितलं.
हेही वाचा : Kangana Ranaut: कंगना रनौत रॉयल लूकमध्ये शोस्टॉपर; म्हणाल्या, ‘आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करायला हवी’





