बांधकाम मजुरांच्या आरोग्य योजनेचा नेवासामधून शुभारंभ; मंगेश चिवटे यांच्या हस्ते झाले उदघाटन

नेवासा (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्यातील बांधकाम मजुरांच्या आरोग्य योजनेचा शुभारंभ नेवासा येथून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत बुधवार (दि.३१) रोजी कामिका एकादशीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला यावेळी बांधकाम मजुरांच्या आरोग्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पणही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना चिवटे म्हणाले की,बांधकाम मजुरांसाठी आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली असून नेवासा तालुक्याचा मागासलेला आरोग्य सेवेचा अनुशेष भरून काढण्यासाठी समर्पण फाउंडेशन समवेत उच्चस्तरीय प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी मंगेश चिवटे यांनी दिली.यावेळी बांधकाम मजुरांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभही बांधकाम कामगारांना यावेळी देण्यात आला.
नेवासा तालुक्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व बांधकाम कामगार आरोग्य योजना रुग्णालयात लागू करण्यात आलेली असून तपासणी ते उपचार या योजनेतंर्गत बांधकाम मजुरांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी सावता रासकर या कामगारास प्रतिनिधिक स्वरूपात तपासणी ते उपचार या योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा पुरवण्याची हमी देणारे हेल्थ कार्ड प्रदान देण्यात आले समर्पण मजदूर संघाच्या घरेलू कामगार नोंदणी अभियानाची सुरुवात मंगेश चिवटे यांच्या हस्ते घरेलू कामगारांना नोंदणीचे कार्ड सौ.अलका शेवाळे व सौ.अनिता शेजुळ या महिला कामगारांना प्रदान करून करण्यात आली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तसेच बांधकाम कामगारांच्या आरोग्य तपासणी अंतर्गत उपचारासाठी नेवासा तालुक्यात हॉस्पिटल उपलब्ध नव्हते ही बाब लक्षात घेऊन नेवासा फाटा येथील साईसेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तसेच बांधकाम मजुरांच्या आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आलेली असून निवड झाल्याची घोषणाही यावेळी मंगेश चिवटे यांनी व्यासपीठावरून केली. तसे पत्रही त्यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी सुमारे दीडशे मजुरांना भांडी वाटप करण्यात आले आणि सुमारे साडेपाचशे घरेलू कामगार महिलांना घरेलू कामगार कार्ड वाटप करण्यात आले. समर्पण फाउंडेशनच्यावतीने नेवासा तालुक्यासाठी किमान दोन हॉस्पिटल हे आयुष्यमान भारत योजनेसाठी तसेच महात्मा जोतिबा फुले आरोग्यदायी योजने करता अंगीकृत करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्पण मजदूर संघाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात तर प्रमुख पाहुणे डॉ.भारत करडक,युवराज काकडे,दीपक पाटणे,गणेश लंघे,डॉ. अभिजीत त्रिभुवन, सुरेश डिके, बाबा कांगुणे, भाऊसाहेब वाघ,ॲड के.एच वाखुरे,ज्ञानेश्वर पेचे,सुनील मोरे,मनोज पारखे,डॉ.करण गाढे,देवा कडू,राजू किर्तने, बाळू सोमा,अहमदनगर जिल्हा उत्तर नगर आरोग्य दूत सचिन काळे,तपासणी ते उपचार योजनेचे अनंत पवार डॉ.घोगरे,गोविंद नरसाळे,अरुण पवार,जिल्हा क्षयरोगचे राजू बोर्डे व त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी केले,भारत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.





