Satara | जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी भरतीसाठी परीक्षा मार्गदर्शन वर्ग

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयात सन 2013 पासून बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी भरतीसाठी परीक्षा मार्गदर्शन वर्ग आयोजित केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेने 263 बँक क्लर्क व 60 शिपाई या पदासाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून दि. 21 ऑगस्ट 2024 अखेर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ही सर्व पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे.
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. जे उमेदवार गुणानुक्रमे अव्वल मार्क प्राप्त करतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे व त्यामधून अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
संपूर्ण भरती प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा व मुलाखत हे दोन महत्त्वाचे टप्पे असून या भरती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी युवक युवतींना अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता असून हे मार्गदर्शन करण्यासाठी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे भरती परीक्षेबाबत 45 दिवस कालावधीचा मार्गदर्शन वर्ग सुरू केला असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखत प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. इच्छुक युवक, युवतींनी या विशेष बॅचसाठी लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करावेत असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. विजय कुंभार व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विठ्ठल सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयाच्या https://enrollonline.co.in/Registration/Apply/DGCCS वेबसाईटवर लॉगिन करावे अथवा 88887 80554 या नंबर वर संपर्क साधावा.




