Satara | कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठासाठी बोधवाक्य सूचक प्रा. डॉ. वाघमारे यांचा सन्मान

सातारा, (प्रतिनिधी) – येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठासाठी ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी सुचवले. ते बोधवाक्य विद्यापीठ नियामक मंडळाने मान्य केल्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झालेल्या विद्यार्थी मेळावात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचे हस्ते ग्रंथभेट व गुलाब फुल देऊन करण्यात आला. यावेळी संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख, सहसचिव बी. एन. पवार, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, माजी विद्यार्थी संघाचे प्राचार्य शहाजी डोंगरे, प्रा. एम. एस शिंदे, प्रा. डॉ. अभिमान निमसे, कॅप्टन प्रल्हाद गायकवाड, पुनाप्पा वाघमारे, प्राचार्य सांगळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नवीन विद्यापीठ झाल्याने
छत्रपती शिवाजी कॉलेजचे माजी विद्यार्थी व सध्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख असलेले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी पाली भाषेतील‘ अत्त दीप भव’ हे बोधवाक्य सुचवले होते. ते मान्य झाल्यानंतर विद्यापीठाने त्यांना पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले होते.
प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील, माळशिरस तालुक्यातील मळोली या गावातून आलेले सुभाष वाघमारे १९८३ ते १९९० या काळात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. १९९० ला एम. ए.ला मराठी विषयात त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. मराठीचे प्राध्यापक म्हणून ३४ वर्षे त्यांची सेवा झाली आहे.





