IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला मिळाला नवा फलंदाजी प्रशिक्षक; द्रविडच्या साथीने भारताला विश्वविजेता बनवण्यात दिलंय मोठं योगदान…

IPL 2025 (Rajasthan Royals batting coach) : आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आता RR फ्रँचायझीने विक्रम राठोडचा (Vikram Rathour) फलंदाजी प्रशिक्षक म्हणून समावेश केला आहे. विक्रम हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत, परंतु 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपला होता. ते आता राहुल द्रविडसोबत राजस्थान रॉयल्समध्ये काम करताना दिसणार आहे.
दरम्यान, राहुल द्रविड आणि विक्रम राठोड या जोडीने टीम इंडियाला 2023 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीत गाठण्यात आणि 2024 टी-20 विश्वचषक अंतिम फेरी जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांची जुगलबंदी आता राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवण्याच्या प्रवासाला निघणार आहे.
Rathour bhi, Royal bhi! 💗
T20 World Cup winning coach Vikram Rathour joins our support staff and reunites with Rahul Dravid! 🤝🔥 pic.twitter.com/YbGvoMQyrv
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 20, 2024
या संदर्भात बोलताना राजस्थान संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, “राठोड यांच्याकडे असलेले तांत्रिक कौशल्य, शांत स्वभाव आणि भारतीय परिस्थितीची असलेली सखोल समज या गोष्टी राजस्थान संघासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे राजस्थान संघाला आणखी मजबूत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
IPL 2025 : मेगा लिलावाच्या तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर..! जाणून घ्या,कधी आणि कुठे होऊ शकते आयोजन…
2019 मध्ये भारतीय संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून प्रवेश करण्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षक होण्यापूर्वी राठोड यांनी भारतासाठी सहा कसोटी आणि सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. राठोड यांनी चार वर्षे राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही काम केले असून त्यांनी देशांतर्गत पंजाब आणि हिमाचल प्रदेशचे या संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. यापूर्वी त्यांनी पंजाब किंग्जसोबतही काम केले. पावसामुळे वाया गेलेल्या अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटीसाठी देखील ते अफगाणिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते.





