“प्रत्येक दिवस, निर्णय अन् प्रत्येक धोरण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित” ; पंतप्रधानांचे महामानवाला अभिवादन

PM Modi Haryana Visit । पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणातील हिसार येथे आहेत. ते हिसार विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी याठिकाणी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिसार ते अयोध्या या व्यावसायिक विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला. हिसारमधील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी देखील त्यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांनी डबल इंजिन सरकारचे कौतुक करताना, ‘आज भाजप विकसित हरियाणा – विकसित भारत यावर गांभीर्याने काम करत आहे हे पाहून मला अभिमान वाटतो.’असे म्हटले.
‘हरियाणामध्ये भाजपचा पाया मजबूत झाला’ PM Modi Haryana Visit ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “हिसारशी माझ्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. जेव्हा भाजपने मला हरियाणाची जबाबदारी दिली तेव्हा मी याठिकाणी अनेक सहकाऱ्यांसोबत बराच काळ काम केले. या सर्व सहकाऱ्यांच्या कठोर परिश्रमाने हरियाणात भाजपचा पाया मजबूत झाला आहे. आज मला अभिमान आहे की भाजप विकसित हरियाणा आणि विकसित भारताच्या ध्येयाकडे पूर्ण गांभीर्याने काम करत आहे.”असेही त्यांनी यावेळी म्हटले.
‘बाबासाहेबांचा संदेश ११ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “आज संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचा जीवन संदेश आमच्या सरकारच्या ११ वर्षांच्या प्रवासासाठी प्रेरणास्थान बनले आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक निर्णय, प्रत्येक धोरण बाबा साहेब आंबेडकरांना समर्पित आहे. आमचे उद्दिष्ट वंचित, पीडित, शोषित, गरीब, आदिवासी, महिलांच्या जीवनात बदल घडवून आणणे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करणे आहे. यासाठी सतत विकास, जलद विकास हा भाजप सरकारचा मंत्र आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
चप्पल घातलेला माणूसही विमानात उडेल PM Modi Haryana Visit ।
पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज हरियाणा ते अयोध्या धामपर्यंत विमानसेवा सुरू झाली आहे. याचा अर्थ असा की आता श्रीकृष्णजींची पवित्र भूमी, हरियाणा, थेट भगवान राम यांच्या शहराशी जोडलेली आहे. लवकरच याठिकाणावरून इतर शहरांसाठीही विमानसेवा सुरू होईल. आज हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणीही करण्यात आली आहे. हरियाणाच्या आकांक्षा एका नवीन उंचीवर नेण्यासाठी ही विमानसेवा सुरू आहे.” ते पुढे म्हणाले, “माझे तुम्हाला वचन होते की चप्पल घालणारे देखील विमानात उडतील आणि आम्ही हे वचन देशभर पूर्ण होताना पाहत आहोत.”
हेही वाचा
मुलगा वाचला, देवापुढे मान झुकली.! पवन कल्याण यांच्या पत्नीने पूर्ण केला नवस, तिरुमला मंदिरात केस अर्पण!





